breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील कामाच्या तपशीलाच पुणे महापालिका करणार अनुकरण

कडक लॉकडाऊन करूनही गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे मुंबईत वरळी आणि धारावीत ज्या पद्धतीने कोरोनावर नियंत्रण आणण्यात आलं, त्याच धर्तीवर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उपाययोजना करण्यात येणार असून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मुंबईतील कामाचा तपशीलच आज पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिला.

निर्मुलाविषयीची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबईचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी करोना रोखण्यासाठी मुंबईत करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. मुंबईत करोना चाचण्यांवर सर्वाधिक भर देण्यात आला. घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला.

फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून ताप तपासण्यात आला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली, चेस द व्हॉयरस आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सारख्या संकल्पना राबवण्यात आल्या असून या गोष्टी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कशापद्धतीने राबविता येईल, याची माहितीही त्यांनी दिली. तसेच मुंबईत रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात आली होती, बेडची संख्या वाढवण्यासाठी क्वॉरंटाइन सेंटर निर्माण करण्यात आले, कंटेन्मेंट झोन करतानाच सीलबंद इमारती हा नवा प्रकारही तयार करण्यात आलाय.

तसेच डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचेही चहल यांनी सांगितले. तसेच करोना रुग्णांना कोणती कोणती औषधे देण्यात आली याची माहितीही त्यांनी दिली. त्याशिवाय खासगी रुग्णालये, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाविषयीची माहितीही देण्यात आली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’ची गंभीर लक्षणे असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत, असं निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button