Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड, भीम आर्मीचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/6-6.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज (शुक्रवारी) भीम आर्मीने अनोखं आंदोलन केलं, ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ असं म्हणत भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेवर निशाणा साधला.
भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रुग्णालयातील बेड आणून ठेवत ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देतं का बेड?’ असं म्हणत आंदोलन केलं. यावेळी भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच अधिकचे बेड उपलब्ध करुन देण्याऐवजी रुग्णांना घरीच ठेवण्यावर आक्षेप घेतला.