breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना… पुण्यात 3 दिवसासाठी 40 हजार दुकाने करणार बंद

पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या कालावधीत पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये सोने, चांदी,कपडे अशा दुकानांचा समावेश असणार आहे. पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अफवांचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसपेक्षा अफवांमुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातून नागरिकांच्या हातून कायद्यांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कुणालाही पॅनिक करू नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे., महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button