breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते,’वेलकम एकनाथ खडसे साहेब’

आमदार रोहीत पवार यांचे अत्यंत मार्मिक ट्वीट

पुणे |महाईन्यूज|

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खास शैलीत ट्विट करत खडसेंच्या निर्णयाचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अत्यंत मार्मिक ट्वीट केले आहे. निसर्गाचा नियम सांगत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असं सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात जोरदार स्वागत केले आहे.

मागील वर्षी म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून मेगा भरती हा उपक्रम राबवत अनेक आमदार, खासदार व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार व नेते पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता राज्यात पुन्हा येणार नाही असा या साऱ्यांचा कयास लावण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. याच घटनेचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपला टोमणे मारत निसर्गाच्या नियमाची आठवण करून दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button