Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
ऐन थंडीत जुळ्यांना फेकून दिले तलावाजवळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-15.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पाषाण तलावाजवळ एका दिवसाचे जिवंत जुळे अर्भके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या बाळांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज सकाळी पाषाण तलावाजवळ साडे आठच्या दरम्यान फिरायला येणाऱ्या नागरीकांना मुलगा व मुलगी अशी जुळी अर्भके आढळून आली आहेत. ऐन थंडीत या जुळ्यांना तलावाशेजारी ठेवले होते. नागरिकांनी ताताडीने चतु:शृंगी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/pashan-lake.jpg)
पोलिसांनी या अर्भकांना ससून रुग्णालयात हलवले आहे. ही अर्भके या ठिकाणी कोणी सोडून दिली याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे