breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एक वेळचं जेवण हाच गरीबांचा व्हॅलेंटाईन डे – गौतम कोतवाल

– व्हॅलेंटाईन डे ऐवजी युवा अस्मिता संस्थेतर्फे ‘रोटी डे’ साजरा

पुणे । प्रतिनिधी

संपुर्ण महाराष्ट्रात युवकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी गेली 25 वर्षे काम करणार्‍या युवा अस्मिता संस्थेने पुणे, बुलढाणा, मुंबई, सातारा या जिल्हयात व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा केला. गरीब व गरजू लोकांना एक वेळचं जेवण पोटभर मिळावं हा यामागील उद्देश. एक वेळचं जेवण हाच गरीबांचा व्हॅलेंटाईन डे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य युवा अस्मिता संस्थेचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी केले.

१4 फेब्रुवारी हा तरूणाईचा सर्वात आवडता दिवस. या दिवशी तरूण-तरूणी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देवून आपले प्रेम व्यक्त करतात. यातूनच अनेक वेळा काही चांगल्या तर काही वाईट घटना घडतात. वाईट घटनांमुळे अनेकांचं आयुष्य उध्वस्त होतं. या प्रथेला फाटा देत युवा अस्मिता संस्था गेली 3 वर्षे व्हॅलेंटाईन डे हा ‘रोटी डे’ म्हणून साजरा करते. व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसी अथवा प्रियकराला गिफ्ट देण्याऐवजी गरीब व गरजू लोकांना पोटभर अन्न देवून हा दिवस अनेक तरूण-तरूणी साजरा करतात.

कार्यक्रमाचे आयोजन युवा अस्मिता संस्थेचा युवा अध्यक्ष कुणाल चव्हाण, शहराध्यक्ष यशराज कदम यांनी केलं. रोटी डे ही संकल्पना कुणाल चव्हाण या महाविद्यालयीन तरूणाच्या संकल्पनेतून साकारली गेली. पुण्यात डेक्कन जिमखाना येथील भिडे ब्रीज जवळ या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका गायत्री खडके, प्रसिद्ध उद्योजक संतसिंग मोखा, अजितसिंह राजपाल, संस्थेचे संस्थापक रविंद्र चव्हाण, कुमोदिनी चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात जेष्ठ कार्यकर्ते विश्‍वास पवार, अस्मिता बलाक्षे, बाबू नाईक, सत्यवान घागरे, भूषण येळकर, मंगेश भोसले, संदिप गाडे, अमृत शिंदे, उमेश बोरगांवकर, बाळकृष्ण पारखी, कटके, युवा टीमचे हार्दीक जोसेफ, सुमीत अलतेकर, प्रज्योत कांबळे, पल्लवी पंतगे, अवनी हरकरे, छाया पैठणकर, अविनाश कदम, गौरी पैठणकर यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button