breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ई-पाससाठी अत्यावश्‍यक सेवा कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून अडवून

पुणे –  महापालिकेच्या अग्निशमन दलाचाही समावेश आहे. मात्र, शहर पोलिसांकडून ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडवून पुन्हा घरी पाठविले जात आहे. तर, ओळखपत्र दाखवूनही पोलिसांचा ई-पास घेतला नाही म्हणून कर्मचाऱ्यांना अडविले जात असल्याची तक्रार पालिकेच्या अग्निशमनदलाने महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे. 

पुणे मनपाची अग्निशमन सेवा ही अत्यावश्‍यक स्वरुपाची सेवा असून, या सेवेतील अधिकारी व कर्मचारी शहराच्या विविध भागांतून तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागांतून कामासाठी शहरात येतात. त्यांना खात्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र दाखविले असता पोलीस विभागाकडून त्यांना कामावर जाणे-येणेस सोडणे अपेक्षित आहे.

मात्र, मागील 2 ते 3 दिवसांपासून या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी ओळखपत्र दाखविले असताना देखील पोलीस विभागाकडून दिला जाणारा ई-पासचा आग्रह करण्यात येत असून प्रसंगी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सदर बाब अतिशय चुकीची व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची, त्यांची कामावरील उपस्थिती कमी होण्याची व या सेवेवर अतिरिक्‍त ताण येण्याचीही शक्‍यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे तातडीने पोलीस आयुक्‍तांशी चर्चा करून या कर्मचाऱ्यांना ई-पाससाठी अडविण्यात येऊ नये, अशी मागणी पोलीस आयुक्‍तांकडे करण्याची विनंती या विभागाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button