इस्लामपूरच्या तरुणाची अनोखी स्वच्छता मोहीम, नव्या वर्षात पाचशे स्मशानं स्वच्छतेचा संकल्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/6-10.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
सांगलीच्या इस्लामपूर येथील एका तरुणाना अनोखी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्या तरुणानं नव्या वर्षात 500 स्मशानं स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. त्याच्या या संकल्पाचा सर्वत्र स्वागत होत आहे.
चंद्रशेखर तांदळे असं या तरुणाने स्मशानभूमींच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. आतापर्यंत त्याने ३३३ स्मशानभूमी स्वच्छ केल्या आहेत. चंद्रशेखरने ५०० स्मशानं स्वच्छ करण्याचा संकल्प केला असून त्याने अंधश्रद्धा निर्मुलनाचंही काम करु लागला आहे. स्मशानही स्वच्छ असलं पाहिजे, असा विचार त्याने सर्वांपुढे ठेवला. या विचारातून त्याने माणसाला अखेरचा निरोप देणारं हे ठिकाण म्हणजेच स्मशानभूमीसुद्धा कायम स्वच्छ ठेवण्याचं अभियान हाती घेतलं आहे.
स्मशानात मृताच्या अंत्यसंस्कारासाठी आप्तांनी केलेल्या विधींनंतर होणाऱ्या अस्वच्छतेमुळं कुठेतरी या अंत्यविधींचीही कुचंबना होत होती. पण, चंद्रशेखरच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमीही नीटनेटकी दिसू लागली आहे. जे काम प्रशासनानं करणं अपेक्षित होतं तेच काम हा अवलिया करतो हे मात्र सर्वतोपरी कौतुकास्पदच म्हणावं लागेल.