इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर
![Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar demands first Modi and Uddhav Thackeray should get corona vaccine on live TV then I will be vaccinated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Prakash-Ambedkar-copy.jpg)
पुणे | मुंबई महानगरपालिकेने वाडिया रुग्णालयाचे 98 कोटी रुपयांचे अनुदान थकवल्याने हे रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. “इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे प्रकाश आंबेडकरांनी स्वागत केले. मी तो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्णय म्हणणार नाही. त्यापूर्वीही आम्ही अनेकदा नाईट लाईफ बघितल्या आहेत. जगलो आहे. त्यांच्याच सरकारने हे सर्व बंद केलं होतं. आता त्यांचा नातू म्हणतो की, ते चालू करावं. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते चालू करावं, अशी माझी विनंती आहे. मी त्याचे पूर्णपणे समर्थन करतो. कारण एका वर्गाला जो डे टाईम सर्व्हिस करतो त्याला सोशल लाईफच नाही. त्यामुळे त्याच्या वेळेप्रमाणे त्याची सोशल लाईफ झाली पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.