breaking-newsताज्या घडामोडीपुणे

इंदापूरमधील ४० नमुन्यांपैकी ९ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । प्रतिनिधी

इंदापूर शहरातील 40 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील नऊ जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

इंदापूर शहरातील एक मध्यमवयीन महिला व पुरुष कोरोनाबाधीत असल्याचे आढळले होते. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी महिलेच्या थेट संपर्कात आलेले नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील कोरोना केअर केंद्रात औषधोपचार सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button