इंदापुरात कोरोनाचा पाचवा बळी, आरोग्य केंद्रातील परिचारिकेला लागण
पुणे |महाईन्यूज|
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा पाहायला मिळत आहे. कोरोनानं पाचवा बळी घेतला असून लासुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. लासूर्णे , भिगवण स्टेशन या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. इंदापूर तालुक्यात कोविड केआर सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात आहेत. वरचेवर सापडणाऱ्या रुग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने तालुक्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.