breaking-newsताज्या घडामोडीपुणे
आरटीई शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरा आजपासून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rte.jpg)
पुणे महाईन्यूज
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश फेरीला आज बुधवार १२ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज दुपारी चार वाजतापासून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकहून भरता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी आहे. अधिक माहिती ‘आरटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनायाकडून देण्यात आली आहे.