आयुर्वेद कॉन्फरन्सचा 250 डॉक्टर्सनी घेतला लाभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/IMG-20180409-WA0049-1.jpg)
पिंपरी – चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे फॅमिली फिझिशियन्स अससोसिएशन द्वारा आयोजित ह्पॅकॉन आयुर (FPACON AYUR) या आयुर्वेदाच्या एक दिवसीय कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाचा सुमारे 250 डॉक्टर्सनी लाभ घेतला.
ही कॉन्फरन्स रविवारी (दि. 15) घेण्यात आली. त्यामध्ये केरळचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ व वक्ते डॉ. गोपाकुमार प्रमुख अतिथी होते. त्यांच्याच हस्ते डॉ. नितीन भिसे, डॉ. संगीता गायकवाड आणि डॉ. दीपाली भिसे संचलित “त्रिमर्म आयुर्वेद” या फ्रांचायसी तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आयुर्वेद सेंटरच्या www.trimarma.com या संकेतस्थळाचे उदघाटन डॉ. गोपाकुमार यांच्या हस्ते झाले. आयुर्वेद या चिकित्सा शास्त्राद्वारे रुग्णांची सेवा करू इच्छिणाऱ्या व आयुर्वेद क्षेत्रांत आपले करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन तरुण बीएएमएस पदवीधारकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने त्रिमर्म आयुर्वेदची स्थापना केली गेली, असे मार्गदर्शन तज्ञांनी केले.
या कॉन्फरन्समध्ये डॉ. गोपाकुमार यांच्यासह, डॉ. उपेंद्र दीक्षित (गोवा), डॉ. रणजित निंबाळकर (पुणे) व डॉ. प्रशांत सुरू (पुणे) आदी सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ २५० डॉक्टर्सनी घेतला. ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी फॅमिली फिझिशियन्स अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे, तसेच डॉ. प्रशांत माने, डॉ. गणेश भोईर, डॉ. अनिकेत अमृतकर , डॉ. संगीता गायकवाड, डॉ. नितीन भिसे, डॉ. दीपाली भिसे, डॉ. पद्मनाभ केसकर व डॉ. विजय शिर्के यांचे विशेष योगदान होते.