आयसीएआय’तर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी ‘ऍस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
![ICAI organizes 'Aspire to Inspire' National Conference for CA students CA, National Council, The Institute of Chartered Accountants of India (ICAI) Pune Branch, Student Skills Enrichment Board (Board of Studies), ICAI,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/आयसीएआय.jpg)
– खासदार डॉ. अमोल कोल्हे, नौदल अधिकारी सुनील भोकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
– ८ – १० जानेवारीला होणार परिषद
पुणे | प्रतिनिधी
सीए विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ८, ९ व १० जानेवारी २०२१ या तीन दिवशी आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे ही परिषद प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे विकासा यांच्या संयुक्त विद्यमाने हि परिषद होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलाचे व्हॉइस ऍडमिरल सुनील भोकरे, खासदार अमोल कोल्हे, उद्योजक अभिजित पवार उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेचा समारोप रविवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी सीए डॉ. एस. बी. झावरे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पाठारे यांनी दिली आहे.
या तीन दिवसीय परिषदेमध्ये तांत्रिक, प्रेरणादायी, तसेच विशेष सीए सत्र होणार आहेत. आयएएस अधिकारी सीए संपदा मेहता, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या कार्यकारी संचालक आर. एम. विशाखा यांचेही विशेष मार्गदर्शन सीएच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासह स्वामी गोविंददेव गिरी महाराज, सीए जय छायरा, सीए राजेश शर्मा, सीए दयानिवास शर्मा, सीए प्रमोदकुमार बुब, सीए चंद्रशेखर चितळे, सीए भारत फाटक, डॉ. संजय मालपाणी यांची विशेष व्याख्याने होणार आहेत. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी www.puneicai.org या संकेस्थळाला भेट द्यावी, असेही धामणे यांनी कळविले आहे.