आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायचं, आता पाटलांच्या पोरींनी देखील नाचलं पाहिजे : लक्ष्मण माने
पुणे – “पाटलानी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची चांगली पोरगी आमच्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे.”असे वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी पुण्यात केले.
पुण्यातील ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत बोलताना माने म्हणाले की, “आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो.आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल करून माने म्हणाले,” आता आमची लोक बॅंड वाजवणार नाहीत, पाटलांचे बॅंड असले पाहिजेत. आता तुम्ही फेटे उडवू नका. तुम्ही बॅंड वाजवा.” “सत्तर वर्षे त्यानी खूप खाल्ले आहे. आता आम्ही सत्ता मिळवणार आहोत. आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. मागणाऱ्याच्या रांगेत आम्ही नसणार आहोत.आम्हीच आमची सत्ता निर्माण करू.”असा विश्वास माने यांनी व्यक्त केला