ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

प्रवीण तरडे लवकरच दाक्षिणात्य सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत

मराठी हिंदीनंतर त्यांनी आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला

मुंबई : ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ या सिनेमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेते प्रवीण तरडे. मराठीसह त्यांनी बॉलिवूडमध्येही आपले स्थान उमटवले आहे. सध्याच्या घडीला मराठी मनोरंजन विश्वात हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक-अभिनेत्यांच्या यादीमध्ये तरडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आता मराठी हिंदीनंतर त्यांनी आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये ते मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दाक्षिणात्य सिनेमात साकारणार मुख्य खलनायक

या आगामी दाक्षिणात्य सिनेविश्वात ते मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून सिनेमाचे पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली. ते ‘अहो विक्रमार्का’ या सिनेमात दिसणार आहेत. असुरा असे त्यांच्या पात्राचे नाव असणार आहे. सोशल मीडियावर एक खतरनाक लूक त्यांनी पोस्ट केला. त्यांनी असं लिहिलं की, ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत “मुख्य खलनायक ” म्हणुन माझा प्रवेश… अहो विक्रमार्कामध्ये “असुरा ” बनून येतोय तुमच्या भेटीला.. मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे.’

त्यांनी पोस्टच्या शेवटी असे लिहिले की, ‘अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे’. प्रवीण यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा मराठीसह सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला हे कलाकारही आहेत.

कमेंट आणि लाइक्सचा पाऊस

अभिनेत्याने पोस्ट शेअर केल्यानंतर ‘आरारारा खतरनाक’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘खतरनाक सर’, ‘हार्दिक अभिनंदन’ अशा अनेक कमेंट आल्या आहेत. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘फुलवंती’ सिनेमात बायकोसह निभावणार ही जबाबदारी

प्रवीण यांच्या मराठीतील कामाविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्यावर ‘फुलवंती’ या सिनेमाच्या संवाद लेखनाची जबाबदारी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे करणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळीने या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button