breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘महाराष्ट्राला पहिला महिला मुख्यमंत्री काँग्रेसच देईल’; प्रणिती शिंदे

देशाला पहिल्या महिल्या पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षा काँग्रेसने दिल्या

पिंपरी : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही मंत्री नाही. महिला व बालकल्याण खातेही महिलेकडे नाही. ही मोठी शोकांतिका असल्याची टीका करत राज्याला पहिला महिला मुख्यमंत्री काँग्रेस पक्षच देईल असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. त्या पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महिला मंत्र्यांकडे नगरविकास, महसूल, उत्पादन शुल्क अशी खाती मिळाली पाहिजेत. या सरकारमध्ये तर एकह महिला मंत्री नाही. महिलेकडे महिला व बालकल्याण खातेही नाही. या देशाला पहिल्या महिल्या पंतप्रधान, महिला राष्ट्रपती, महिला लोकसभा अध्यक्षा काँग्रेसने दिल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री काँग्रेसच देईल, असं प्रणिती शिंदे म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले. त्यामुळे आज अनेक महिला संरपंच, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, महापौर म्हणून चांगले काम करत आहेत. विधानसभा, लोकसभेला महिलांना आरक्षण दिले पाहिजे. पण, भाजप देत नाही असा आरोपही प्रणिती शिंदेंनी केला.

काँग्रेस दलितांवर कधीही अन्याय केला नाही. सुशीलकुमार शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. देशाचे गृहमंत्री, उर्जामंत्री केले. लोकसभा नेता केले. काँग्रेसने कधीही दलितांवर अन्याय केला नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button