breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान- अमृता फडणवीस

मुंबई |

२१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस दिले आहेत. यानंतर केंद्रातील सर्व मंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट केले होते.

पंतप्रधान मोदींनी देखील लसीकरणाची आकडेवारी ट्विट करत भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत असल्याचे म्हटले होते. भारतातील लसीकरण मोहिमेत हा मोठा पल्ला गाठल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत सर्वाना मोफत लस देण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत आहे! ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन. सर्वांसाठी मोफत लस हे आमचे वचन कायम आहे. सर्वांना लस, मोफत लस असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले होते. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं वर्णन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button