breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता घरातच पूजा करावी- दिनेश यादव

  • कुदळवाडीत बचत गटांच्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप..
  • वटपौर्णिमेनिमित्त दिनेश यादव युवा मंचचा उपक्रम…

पिंपरी |

येत्या २४ जुनला वटपौर्णिमा आहे. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. या निमित्त कुदळवाडीत दिनेश यादव युवा मंचच्या वतीने परिसरातील बचत गटाच्या महिलांना वडाचे रोप वाटपाचा उपक्रम आज बुधवारी (दि.२३) राबविण्यात आला.

या उपक्रमात जवळपास शेकडो महिलांना वडाच्या रोपाचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी महिलांनी केला. यावेळी ‘फ’ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संजय जगदाळे, शैलेश मोरे, नितीन मोरे, काका शेळके, प्रकाश चौधरी, रुषीकेश भालेकर परिसरातील महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या.

कोरोना काळात कित्येक रुग्णांचा “ऑक्सिजन” विना जीव गेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. वृक्षारोपण होणे गरजचे आहे. त्यासाठी वडाच्या रोपांचे वाटप कुदळवाडी प्रभागातील महिला बचत गटांना करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पुजा करावी व या वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करावे, असे आवाहन आयोजक दिनेश यादव यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button