खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात महिलांचा लाडू वरून वाद, व्हिडीओ व्हायरल
![Women argue over ladoo at MP Supriya Sule's event](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Supriya-Sule-Nashik-780x470.jpg)
नाशिक | नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये लाडू चिवड्यावरून वाद झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळे महिला मेळाव्याच्या भाषणात काय म्हणाल्या?
सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणली. तुमच्या भवितव्यासाठी योजना नाही, त्यांच्या स्वार्थासाठी. कोण मुख्यमंत्री, लाडकी बहीण म्हणतो कोण, लाडकी बहीण म्हणतो मला नेमकं नाव माहिती नाही. सगळे प्रश्न पैशाने सुटत नाहीत. ते घाबरले आहेत. दिवाळी आधी आणखी ५ हजार देतील. दिवाळीच्या आधी पैसे काढून घ्या. यांचा काही भरोसा नाही. जिल्हा बँकेतील फक्त एका व्यक्तीवर कारवाई केली. इतर १२ लोकांवर कारवाई नाही. कारण ते सत्तेत आहेत. सगळ्यांना आम्ही न्याय देऊ. गरिबांचे पैसे डुबवले असेल तर कोर्टात जाऊन सुप्रिया सुळे न्याय मिळवून देईल.
हेही वाचा – ‘भाजपला २०२४ ला सगळ्यात मोठा फटका बसणार’; मनोज जरांगेंचा इशारा
आम्ही १५०० ला नाते विकणारे नाही. लाडकी बहीण जाहिरातीसाठी २०० कोटी खर्च केले. शून्य किती माहिती नाही, आमच्या महिला कच्च्या आहेत. २०० कोटी कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आणि अंगणवाडी सेविका, आशा भगिणिंना द्या. आशा सेविकांना ५ हजार दिले नाही तर सुप्रिया सुळे आंदोलनाला बसणार, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.