चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार? भाजपचे ‘कमळ’ फुलणार?
![Will Ashwini Jagtap win in Chinchwad?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/ashwini-jagtap-nana-kate-and-rahul-kalate-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे रणांगणात आहेत. तिरंगी अशी ही लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजेच २ मार्चला लागणार आहे. मात्र मतमोजणीपूर्वीच एक एक्जिट पोल समोर आला आहे.
‘द स्ट्रेलेमा’ या पुण्यातील संस्थेचा एक्जिट पोल प्रसिद्ध झाला आहे. मतमोजणीपूर्वीच एक आकडेवारी समोर आली आहे. यानुसार चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप यांना १ लाख २५ हजार ३५४ मतं मिळतील. त्या ३२ हजार ३५१ मतांनी विजयी होतील. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना ९३ हजार ३ मतं तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ इतकी मतं मिळतील.
चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप यांना ४४ टक्के मतं मिळतील तर नाना काटे यांना ३२ टक्के मतं मिळतील आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना २१ टक्के मतं मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे. विजयातील अंतर हे १२ टक्क्यांचं असेल असा सर्वेचा अंदाज आहे.
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात एकूण मतदान ५ लाख ६८ हजार ९५४ इतके आहे. मात्र २ लाख ८७ हजार १४५ इतके मतदान झाले आहे. म्हणजेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५०.४७ टक्के मतदान झाले आहे
हा सर्वे द स्टोलिमा या संस्थेचा आहे. याबाबत आम्ही सर्वे केलेला नाही. तसेच द स्ट्रेलिमाच्या सर्वेबाबत कुठलाही दावा करत नाही.