breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

‘व्हाय आय किल्ड गांधी’ : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा अखेर ‘आत्मक्लेश’

आळंदी । प्रतिनिधी

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची मुख्य भूमिका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अखेर आत्मक्लेश करावा लागला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून टीकेचे लक्ष्य झाल्यानंतर कोल्हे यांनी आळंदीतील महात्मा गांधी स्मारकाला भेट दिली आणि आपल्या भूमिकेबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे.

‘व्हाय आय किल्ड गांधी ’ चित्रपटातील मुख्य पात्र नथुराम गोडसे याची भूमिका पुरोगामी आणि फुले-शाहू- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. यावरुन महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेससह गांधीवादी विचाराधारेतील जनमानसांतून कोल्हेंच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर अक्षरश: जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.

दरम्यान, कोल्हे यांनी थेट आत्मक्लेश करुन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, महात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही.त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

तसेच, चित्रपटात नथुरामची भूमिका केली, पण त्या विचारधारेचे मी कदापि समर्थन करणार नाही. अशा क्षुल्लक गोष्टीने महात्मा गांधींचे विचार कधीही पुसले जाणार नाही. या निमित्ताने आजच्या तरुणाईमध्ये महात्मा गांधींबद्दल असलेली आस्था, निष्ठा बघून मला खूपच आनंद झाला. महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्वच यातून सिद्ध होते. सत्य, अहिंसा आणि क्षमाशीलतेचा त्यांनी जगाला दिलेला विचार संपूर्ण मानवजातीसाठी मोलाचा आहे. मीही त्या विचारांचा पाईक आहे, असा दावाही खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button