राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे हवं? अजित पवार की सुप्रिया सुळे? अमोल कोल्हे म्हणाले..
![Who wants the leadership of NCP? Ajit Pawar and Supriya Sule Amol Kolhe said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-supriya-sule-and-amol-kolhe-780x470.jpg)
पुणे : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट अशे दोन गट राष्ट्रवादी पक्षात पडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असावे याबाबत खासदार आमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
झी मराठी वर मराठी अभनेते अवधुत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम काही दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना राज्यातील राजकीय घडामोडींवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असावे असाही प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा – ‘काँग्रेस फुटणार अशीही चर्चा आहे, आता कोणावर विश्वास नाही’; अबू आझमींचं सूचक विधान
लहान मुलं सुद्धा अगदी ठाम आहेत की कोल्हे यांचा एक पाय भाजपमध्ये आहे !!!
पहा 'खुपते तिथे गुप्ते' 16 जुलै, रविवार, 9 PM#khuptetithegupte #ZeeMarathi #खुपतेतिथेगुप्ते #MarathiManoranjanVishwa #amolkolhe@AvadhootGupte @kolhe_amol pic.twitter.com/B2tGOOTmDw
— मराठी मनोरंजन विश्व (@manoranjanvishw) July 17, 2023
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये खासदार अमोल कोल्हे दिसत आहेत. सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असले पाहिजे? अजित पवार की सुप्रिया सुळे? असा प्रश्न विचारला असता अमोल कोल्हे म्हणाले की, ‘शरद पवार साहेब’. अमोल कोल्हे यांचं हे उत्तर सध्या चांगलच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा संपुर्ण भाग रविवारी २३ जुलैला रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.