Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
एकनाथ शिंदे की राज ठाकरे? बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? संजय राऊत म्हणाले,..
बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण?
![Who is the political heir of Balasaheb Thackeray?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sanjay-raut-and-eknath-shinde-raj-thackeray-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेतून ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेतील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसतात.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीव्ही ९ भारतवर्षच्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी संजय राऊत यांना रॅपिड फायर मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की, बाळासाहेबाचा खरा वारस कोण? आणि यासाठी पर्याय म्हणून उद्धव ठाकरे नसून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे होते.
या प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं की, या दोघांपैकी कोणीही बाळासाहेबांचा राजकीय वारस नाही. जे लोक बाळासाहेबांना सोडून गेले ते त्यांचे वारस बनू शकत नाहीत.