breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैन कोण आहेत?, वाचा सविस्तर..

राज्यपाल रमेश बैन यांची अशी आहे राजकीय कारकिर्द

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल यांची बदली केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या जागी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस यांच्या जन्म मध्य प्रदेशमधील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

बैल यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले आहे.

बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे.
सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button