पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री; कोण आहेत भजनलाल शर्मा?
![Who is Bhajanlal Sharma who is the first time MLA and directly the new Chief Minister of Rajasthan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Bhajanlal-Sharma--780x470.jpg)
Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते सांगानेरचे आमदार असून भाजपचे सरचिटणीस आहेत.
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
भजनलाल शर्मा हे राजस्थानच्या सांगानेर विधानसभा जागेवरुन पहिल्यांदाच निवडून आले आहेत. आगामी लोकसभेत त्यांनी एकूण १ लाख ४५ हजार १६२ एवढी मते मिळवली असून काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मताधिक्यांने पराभव केला आहे. भजनलाल शर्मा मागील अनेक वर्षांपासून भाजपसाठी ग्राऊंड लेव्हलवर काम पाहत होते.
हेही वाचा – मागासवर्गीय आयोगाचा माराठा आयोग करणार का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
#WATCH | BJP names Bhajanlal Sharma as the new Chief Minister of Rajasthan pic.twitter.com/j3awHnmH7k
— ANI (@ANI) December 12, 2023
तसेच भजनलाल शर्मा यांनी राजस्थान विद्यापीठातून १९९३ साली राजशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी मिळविलेली आहे. भजनलाल शर्मा यांनी प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्षसंघटनेत काम केल आहे. आमदार म्हणून ते पहिल्यांदाच निवडून आले. तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल यांना संधी देण्यात आली.
भजनलाल शर्मा भरतपूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. मात्र २००३ साली त्यांनी भाजपाच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता. भजनलाल शर्मा यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असेलल्या भजनलाल यांनी भाजपा पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले आहे. ते चार वेळा प्रदेश महामंत्री होते.