चार महिन्यात काय होणार? यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांचा मोठा दावा काय?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-41-780x470.jpg)
Sharad Pawar : लोकसभेतील आश्वासक विजयाने महाविकास आघाडीने विधानसभेसाठी हुंकार भरला आहे. आज 15 जून रोजी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांची भूमिका मांडली. अनेक मुद्यांवर त्यांनी स्पष्ट मते नोंदवली. भाजपवर घणाघात केला. वंचितवर मत मांडले. तर आगामी काळात काय होऊ शकते, याचा एक अंदाज पण दिला. विधानसभेसाठी काय भूमिका असेल, कोण सोबत असेल याची एक उजळणी केली. येत्या चार महिन्यात काय होणार, यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांनी असा मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले. याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासह महायुतीला त्यांनी आरसा दाखवला.
हेही वाचा – टाटांचा मेगा प्लॅन, थेट मोबाईल क्षेत्रात उडी घेण्याची तयारी, ही कंपनी घेऊन…
यावेळी शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला कसा फटका बसला हे सांगितले. तसेच ही भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही, असे पवार म्हणाले.