breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यातील ५ ठिकाणी मतदान, कुणाकुणामध्ये लढत?

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला. देशभरातील १०२ जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. हे पाचही मतदारसंघा विदर्भातील आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचं कडवं आव्हान असणार आहे. विकास ठाकरे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. यामुळे नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक पाहिजे तशी सोपी नाही हे स्पष्ट आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी आपलं नशिब आजमवलं आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रश्मी यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी पर्यायाने भरलेला अर्ज ग्राह्य धरत ते उमेदवार असतील, असं जाहीर केलं. श्याम बर्वे यांच्याविरोधात शिवसेनेचे (शिंदे गट) राजू पारवे हे उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून किशोर गजभिये यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा    –    निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील मेंढे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रशांत पाडोळे आणि वंचितचे संजय केवट यांचं आव्हान आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान आहेत. तर महायुतीकडून भाजप नेते अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचितकडून हितेश मडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळू धानोरकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. पण ३० मे २०२३ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधननंतर चंद्रपूरच्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button