breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर..; अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर

मुंबई | केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही जोरदार टीका केली. शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत असं अमित शाह म्हणाले. यावरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विशाल पाटील म्हणाले, २०२४ चा अर्थसंकल्प आता मांडला जाईल. जानेवारीत जसा अर्थसंकल्प या सरकारने मांडला होता तसाच तो असेल तर देशासाठी तो निराशाजनक असणार आहे. किमान हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांकडे पाहून मांडला जाईल अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच आहे. महाराष्ट्रातले तीन मुद्दे या अधिवेशनात मी मांडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर मला बोलायचं होतं पण ती संधी मिळाली नाही. या अधिवेशनात राज्याचे मुद्दे मांडायची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा     –        देशासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एक व्हा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन 

महागाई, बेरोजगारी हे मु्द्दे देशापुढचे प्रमुख मुद्दे आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मिळालं. शरद पवारांकडे सगळेच समाज आशेने पाहतात. भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करायचं ठरवलेलं दिसतं आहे, असं विशाल पाटील म्हणाले.

भाजपाने राज्यातील दोन प्रमुख नेते म्हणजेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायचं ठरवलेलं दिसतं आहे. मी एक सांगू इच्छितो की शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तरीही त्यांची सहानुभूती वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी पुण्यात राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलायला हवं होतं, मात्र दुर्दैव आहे की ते तसं काहीच बोलले नाहीत. हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवून राज्यात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो चालला नाही, असंही विशाल पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button