breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

फेरीवाल्यांवर कारवाई करून कायद्याचे उल्लंघन : काशीनाथ नखाते

  • स्लग : हातगाडी, स्टॉलधारक करणार महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करणार

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड  पिंपरी चिंचवड महापालिकेने फेरीवाला धोरण राबविले नाही. त्या ऐवजी शहरातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. महापालिका आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊन कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी केले. नुकतेच आयुक्तानी शहरातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याच्या निषेधार्थ महापालिका भवनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय नॅशनल हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी काशीनाथ नखाते म्हणाले की, महानगरपालिकेचे आयुक्तांना पद स्वीकारुण सहा महिने पूर्ण झाले. कायद्याने दर महिन्यास  फेरीवाला समितीची बैठक घेणे अपेक्षीत आहे. मात्र एकही बैठक न घेता मनमानी पद्धतीने बेकायदेशीररित्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. पथारी, हातगाडी, स्टॉलधारकावर कारवाई करून मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच कायद्याचे उल्लंघन करून त्याची पायमल्ली केली जात आहे. फेरीवाल्यांसाठी जागा निश्चिती बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने करून धमकावून जबरदस्तीने फेरीवाल्यांना दुसरीकडे व्यवसाय करण्याचे सांगितले जात आहे. आयुक्त कायद्याप्रमाणे काम करणार का बेकायदेशीर काम करणार हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. नोंदणीकृत विक्रेत्यावरही अन्यायकारक कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या विरोधात लवकरच महापालिका भवनावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पथारी, हातगाडी, टपरी धारकांनी कायदाअंमलबजावणी साठी आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले आहे .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button