‘दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत
![Vijayakumar Gavit said that Aishwarya Rai's eyes are beautiful because she eats fish every day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Aishwarya-Rai-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चेत आले आहेत. दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर, असं विधान विजयकुमार गावित यांनी केलं आहे.
विजयकुमार गावित म्हणाले, तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरच्या समुद्र किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपान दौर्यावर
मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वाचाही चांगली दिसते, असंही विजयकुमार गावित म्हणाले.