‘अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू’; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
![Vijay Wadettiwar said that the move to make Ajit Pawar the Chief Minister has started](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-and-Vijay-Wadettiwar-780x470.png)
मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडली. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सरकार सैरभैर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपाचा डाव आहे.
हेही वाचा – हिमाचलमध्ये भूस्खलन! शिव मंदिर ढासळले, २१ भाविकांचा मृत्यू, आणखी काही जण अडकल्याची भिती
हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्पम दूर होईल, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.