..तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटू नये; वसंत मोरे यांचं ट्विट चर्चेत

अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी पुण्यात अनेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून कोयतेही जप्त केले आहेत. मात्र तरीही पुण्यातील कोयता गँगती दहशत कमी झालेली नाही. यावरून मनसे नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट केलं आहे. वसंत मोरे यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आज सकाळी जिम ला चाललो होतो. अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या. मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का की मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या.
पण असं वाटण्यामागे कारण असं की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाण मध्ये सकाळी ६ वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला. जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये, असं मनसे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.





