‘शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण’; केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर
GDP मध्ये १९ टक्के वाटा
![Union Agriculture Minister Narendra Singh Tomar said that agriculture is the lifeblood of Indian economy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Narendra-Singh-Tomar-780x470.jpg)
मुंबई : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर भर देणाऱ्या खरीप मोहीम २०२३-२४ चे दिल्लीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेती देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा गाभा असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण आहे तसेच तो देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा गाभा असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) या क्षेत्राचा जवळजवळ १९ टक्के वाटा आहे. सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून असल्याचे तोमर म्हणाले.
गेल्या सहा वर्षांच्या काळात भारताच्या कृषी क्षेत्राचा, वार्षिक सरासरी ४.६ टक्के वाढीसह मोठी विकास झाला आहे. याबद्दल तोमर यांनी समाधान व्यक्त केलं. यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि अन्न सुरक्षेमध्ये कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्र महत्वाचे योगदान देऊ शकल्याचे तोमर म्हणाले.