breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एका हातात छत्री, एका हाती स्टेअरिंग’; एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : काही दिवसांपुर्वी छप्पर उडालेल्या एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. दरम्यान, त्याच आगारातील बसचा अजुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बसचा चालक चक्क एका हातात छत्री तर एका हाती स्टेअरिंग धरत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नव्या व्हिडिओमुळे बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडीओ गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा आहे. पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत आहे. दरम्यान, यापुर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे २ प्रदेशाध्यक्ष ,मग फूट नाही तर काय?’; संजय राऊतांचे विधान

सरकारने एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पण एसटीमध्ये सुधारणा व्हावी आणि नव्या बसेस सेवेत याव्यात अशी मागणी प्रवासी करत असतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button