breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे २ प्रदेशाध्यक्ष ,मग फूट नाही तर काय?’; संजय राऊतांचे विधान

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असल्याचं बोललं जात आहे. परंतु, राष्ट्रावादीत कोणतीही फूट नाही, असं सूचक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. यावरून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आहेत, पण अजित पवार गट नाही. राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, मग ही फूट नाही तर काय आहे? अजित पवारांची हकालपट्टी केली, याला आम्ही फूट समजतो.

हेही वाचा – ‘पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं, पुन्हा असं करणार नाही’; शरद पवारांचे मोठं विधान

शरद पवार कधीच भाजपसोबत जात नाहीत. दोन दगडांवार पाय ठेवून कोणी राजकारण करत असेल तर त्याला जनता उत्तर देईल. शरद पवारांनी पक्षात पडलेल्या फुटीनंतर स्वत: सूत्रे हाती घेतली आहेत. अजित पवार यांची हकालपट्टी केली याला आम्ही फूट समजतो. शरद पवारांचा मोठा गट महाविकास आघाडीबरोबर आहे. आम्ही जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली हे लोकांना देखील माहिती असल्याने लोकांमध्ये संभ्रम नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button