Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अपमान होत असेल तर भाजपला लाथ मारून या’; उद्धव ठाकरेंचं गडकरींना आवाहन

मुंबई | भाजपकडून काही दिवसांपूर्वी १९५ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु भाजपच्या या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. भाजपच्या कार्यक्षम मंत्र्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली नव्हती. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी बोललो होतो, गडकरीजी जर मोदी उमेदवारी देत नसेल तर आमच्याकडे या. आम्ही उमेदवारी देतो आणि अधिकाराने काम करण्यासाठी मंत्रीपदही देऊ. देशात आमचं सरकार देणार आहे. गडकरीजी का झुकता त्यांच्यासमोर, दाखवा त्यांना महाराष्ट्राचा पाणी काय आहे.

हेही वाचा     –     बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात शड्डू ठोकला; म्हणाले.. 

मोदीजी समोरच्याला विचारतात की, कितीचा घोटाळा केला आहेस आणि पक्षात घेतात. मोदीजी ५-१० कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात. तर ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री करतात. मग मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने किती कोटींचा घोटाळा केला असेल, याचा विचार करा. मागे त्यांना कोणी (भावना गवळी) राखी बांधली होती, हे आठवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मोदीजी सत्तेत येईपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, असे म्हणायचे. पण आता उलट शेतीत लागवडीचा खर्च दुप्पट झाला आहे. एकाही शेतकऱ्याने उत्पन्न दुप्पट झाल्याचे सांगावे. मी त्याचा सत्कार करेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी सरकारने देशात आता नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) आणला आहे. त्यामुळे अन्य देशातील नागरिकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. त्याबाबत काही आक्षेप नाही. पण मोदी सरकारला सीएए कायद्याचा वापर करुन धर्माधर्मात तेढ निर्माण करायची आहे. लाखो काश्मिरी पंडित घर सोडून गेले. आधी त्यांना काश्मीरमध्ये परत आणा, मग सीएए कायदा आणा. मणिपूरमध्ये हिंदू नाहीत का? पंतप्रधान मोदी समुद्राच्या बुडाशी जातात मग त्यांना मणिपूरला जाता येत नाही का? तुमच्या दहा वर्षांच्या सत्तेनंतरही राज्यात हिंदू जनआक्रोश मोर्चे का काढावे लागत आहेत? , असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मोदी पूर्वी म्हणायचे की, अच्छे दिन आऐंगे, पण मी म्हणतो, मोदीजी तुमची सत्ता गेल्यावरच देशात अच्छे दिन येतील, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button