Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“..तर फडणवीस आणि भाजपाने शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी”; उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना राज्यातील घडामोडींवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट हल्ला चढवला. भाजपाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पालघर प्रकरणात चौधरी दोषी नसेल तर शिवसेना आणि हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

२५ वर्षे ज्यांना सोबत घेऊन हिंदुत्व या एका शब्दासाठी चोचले ऐकले मान्य केले. महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते अशांना खांद्यावर घेऊन खेड्यापाड्यात घेऊन फिरलो. ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तो काळ पुन्हा येईल. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने दिल्ली थरथरत होती हा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या गीतात जे आहे दिल्लीचेही तख्त राखतो तो खरा मराठा, आपण मध्ये मध्ये बघतो ते दिल्लीचेही बूट चाटतात, ते भगव्याच्या औलदीचे नाहीत, गद्दार आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली.

हेही वाचा       :        पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ 

देश नासवून टाकला जातोय.मला भीती वाटतेय कि अराजकेकडे जातोय कि आपण? कोणालाही पक्षात घेत आहेत. आमच्याकडे अनेक मुस्लीम कार्यकर्ते आहेत. दसऱ्याच्या भाषणात बोललेलो. आपण काही केलं किंवा दुसऱ्यांनी केलं तर लव्ह जिहाद भाजपनं केल तर अमरप्रेम असं सुरु आहे. पालघर येथे भाजपाने एकाला प्रवेश दिला त्या चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपनं साधू हत्यांकाडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. आता त्याच चौधरीला भाजपात प्रवेश दिला. हा हिंदुत्वाचा अपमान नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला? त्याचा संबंध नसेल तर भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button