breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंची मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका!

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ५८ मिनिटांमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. पेण येथील सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो. आतां म्हटलं तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. याची सुरुवात पेणपासून झाली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. निर्मला सीतारामन यांनी जड अंत करनाने हा अर्थसंकल्प मांडला आहे.

हेही वाचा     –      Budget 2024 | अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर..

गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं त्या म्हणाल्या हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन. तुमच्या मित्रापलीकडे देश आहे हे आता १० वर्षानंतर त्यांना कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानू कडे जा? सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही शेतकऱ्यांना आतेरेकी समजत होतात आता त्यांच्या बदल बोलताय. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग १० वर्ष काय केलं? आता खड्डा खाणायचा आहे, मग मतांची माती टाकायची आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन या १० वर्षातील सरकारचा कामाचा आढावा घ्या, अर्थसंकल्पामध्ये जे मांडला गेलं त्यात किती मिळाले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button