अश्लील छायाचित्राच्या आधारे तरुणीवर अत्याचार
![Torture of a young woman on the basis of a pornographic photograph](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rape-l.jpg)
विरार |
अश्लील छायाचित्राच्या आधारे धमकावून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी बिहार येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसई पश्चिम येथे राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीची समाजमाध्यमावर बिहारच्या पटणा येथे राहणाऱ्या अंजुम कमर या तरुणाशी मैत्री झाली होती. आरोपी अंजुम याने १७ फेब्रुवारी रोजी तरुणीला वांद्रे येथे भेटायला बोलावले. यावेळी तरुणीची काढलेली अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली आणि तिला कुर्ला येथील एका हॉटेलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यानंतर तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोडमध्ये महिलेवर बलात्कार
मीरा रोड : विवाहित महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रणजीत शर्मा (३५) हा मीरा रोड येथे राहणारा असून त्याचे याच परिसरातील ५३ वर्षीय महिलेशी संबंध होते. २०१६ पासून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता तसेच विविध घरगुती साहित्याची मागणी करत होता. त्याला विरोध केला असता आरोपी शर्मा याने फिर्यादी महिलेस मारहाण केली. शेवटी तिने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शर्मा याच्या विरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाचा- मेडीकल गॅस पाईपलाईन निविदा रद्द करा – नगरसेवक तुषार कामठे