breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

थरकाप उडवणारा वारा, धडकी भरवणारा पाऊस, मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरकरांची दैना

कोल्हापूर: थरकाप उडवणारा वारा आणि धडकी भरवणारा गारांचा पाऊस यामुळे मान्सून पूर्व पावसाने कोल्हापूरकरांची दैना उडवली. सायंकाळी तासभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावत अक्षरश: झोडपून काढले. अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले. झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी वीजही पडली. पावसामुळे क्षणार्धात रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाहू लागले. तर जनजीवन जागच्या जागी स्तब्ध झाले. पावसाचा मारा इतका प्रचंड होता की दाट धुके पडल्यासारखे वातावरण झाले होते.

कोल्हापुरात मान्सुनचे आगमन १० जूनपर्यंत लांबले असले तरी बुधवारी (१ जून) संध्याकाळपासून मान्सूनपूर्व सरींचे आगमन झाले आहे. शहरात किरकोळ सर वगळता मोठ्या पावसाने हुलकावणीच दिली होती. मात्र, गुरुवारी (२ जून) संध्याकाळी ही सर्व कसर भरुन निघाली. सायंकाळी ५ च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वरुनराजाचे आगमन झाले. विजांचा थयथयाट सुरु झाला. सोबत जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. लगेच गाराही पडू लागल्या. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की समोरचे काही दिसतच नव्हते. शहरासह जिल्ह्यातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली.

दिवसभर हवेत प्रचंड उकाडा होता. सायंकाळी चार नंतर ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. थरकाप उडवणारा वारा आणि धडकी भरवणाऱ्या गारांच्या पावसाने कोल्हापूरकरांना भयभीत केले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाडा गायब होऊन हवेत गारवा निर्माण झाला. यामुळे कोल्हापूरकर सुखावले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज पडल्याने काही ठिकाणी नुकसान झाले. कमी वेळेत जादा पाऊस झाल्यामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक बंद झाली. परीख पुलाखाली पाणी गेल्याने हा महत्त्वाचा रस्ता बंद झाला. झाडे उन्मळून पडल्यामुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले. तासभर पडलेल्या या पावसाने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. जिल्ह्यातील आजरा चंदगड गडिंग्लज यासह बहुसंख्य भागात या पावसाने हजेरी लावली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button