breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधून तीन नावं चर्चेत
काँग्रेसमधून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या उमेदवारांच्या नावाची चर्चा
![Three names from BJP are in discussion for the Pune Lok Sabha by-election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Girish-bapat-1-780x470.jpg)
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. कसब्याचा धडा विचारात घेऊन सावध झालेल्या भाजपकडून उमेदवार निवडीचे निकष ठरवत तीन नावांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
कसब्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेत बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे. तर शहरात बहुजन मतदारांची संख्या लक्षात घेऊन माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
तर निवडणूक झाल्यास काँग्रेसमधून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.