या वाहनांना टोल टॅक्सपासून मिळणार सुटका; नितीन गडकरींची मोठी घोषणा
![These vehicles will be exempted from toll tax; Nitin Gadkari's big announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/nitin-gadkari-780x470.jpg)
दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा टोल टॅक्सबाबत मोठा दिलासा दिला आहे. आता अनेक सरकारी वाहनांना व इतर काही महत्वाच्या वाहनांना मोठ्या टोल टॅक्सपासून सुटका मिळणार आहे. गडकरी यांच्या घोषणेनुसार आता देशातील अनेक लोकांना या टोल टॅक्समधून सूट मिळणार आहे. केंद्र सरकारने टोल टॅक्सबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सूचनांनुसार आता टोल टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. याबाबतची यादीच जारी करण्यात आली आहे.
भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश, भारताचे उपराष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, कॅबिनेट मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभाध्यक्ष, राज्य मंत्री, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, सामान्य अथवा समकक्ष रँकचे चीफ ऑफ स्टाफ, कुठल्याही राज्याचे विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, धान परिषदेचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारत सरकारचे सचिव, राज्य परिषद, संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ, संबंधित राज्यांमध्ये राज्य सरकारचे मुख्य सचीव, विधानसभा सदस्य आणि राज्याच्या दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर यांना टोल टॅक्सपासून सुटका मिळणार आहे.
या व्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना टॅक्स द्यावा लागणार नाही. यात अर्धसैनिक बल, पोलिसांसह वर्दीत असलेले केंद्रीय आणि राज्याचे सशस्त्र दल, अग्निशमन विभाग, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, राष्ट्रीय महामार्गाची पाहणी, सर्वेक्षण, बांधकाम किंवा ऑपरेशन करणाऱ्या व्यक्ती, मृतदेह घेऊन जाणाऱ्या व्यक्ती, संरक्षण मंत्रालय आणि दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेल्या मॅकॅनिकल वाहनांसाठी टॅक्स द्यावा लागणार नाही.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स NHAI कडून वसूल केला जातो. तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल आणि आणि आपण महामार्गावरून प्रवास करत असाल तर, तुम्हाला टोल टॅक्स द्यावा लागणार. तुमच्याकडे दुचाकी असेल तर मात्र तुम्हाला टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. दुचाकी खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जातो.