breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

२०२३ मध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिल्या मोदी सरकारच्या ‘या’ घोषणा!

Narendra Modi : २०२३ या वर्षात देशात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ५ राज्यांच्या निवडणुका ते चंद्रावर चांद्रयान-३ ने केलेलं यशस्वी लँडिग असो… यासह मोदी सरकारनं केलेल्या विविध घोषणांनी जनतेला आकर्षित केलं होतं. पण, २०२३ साली चर्चेत आलेल्या मोदी सरकारच्या या घोषणा कोणत्या? याबद्दल जाणून घेणार आहोत.

महिला आरक्षण : केंद्र सरकारने १९ सप्टेंबर २०२३ ला महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के ‘महिला आरक्षण’ देण्याच्या दृष्टीनं विधेयक लोकसभेत मांडलं आहे. महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभा आणि राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही विधेयकाला मंजूरी दिली आहे. यामुळे विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे.

विश्वकर्मा योजना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ला ‘विश्वकर्मा सन्मान’ या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर व लहान व्यावसायिकांना सवलतीच्या व्याजदराने व तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागीर म्हणजे बारा बलुतेदारांची प्रथमच नोंदणी केली जाणार आहे.

हेही वाचा  –  इस्त्रोची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरूवात, दुसरी अवकाश दुर्बिणी XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण 

पाच वर्षे मोफत धान्यपुरवठा : देशातील ८० कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’ला आणखी पाच वर्षे अर्थात २०२८ पर्यंत मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ करोना महासाथीच्या काळात, टाळेबंदी आणि अर्थचक्र थंडावल्याचा फटका बसलेल्या गरिबांसाठी २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे पाच किलो अन्नधान्य मोफत पुरवण्यात येते.

गॅसच्या दरात २०० रूपयांची कपात : केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅसच्या दरात २०० रूपयांनी कपात केली. ही महिलांना रक्षणाबंधनाची भेट असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. याचा सगळ्यात जास्त फायदा ‘उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांना झाला. कारण, या लाभार्थ्यांना आधीच २०० रूपयांनी कमी दरात गॅस मिळत होता. त्यानंतर २०० रूपयांची कपात केल्यानं ४०० रूपयांनी गॅस स्वस्त झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button