breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

इस्त्रोची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरूवात, दुसरी अवकाश दुर्बिणी XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण

ISRO : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय आवकाश संशोधन संस्था ISROने इतिहास रचला आहे. इस्रोने XPoSAT सॅटलाइट लॉन्च केलय. श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरुन सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी XPoSAT सॅटलाइट लॉन्च करण्यात आलं. भारत अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनला आहे. XPoSAT ब्लॅक होलच रहस्य उलगडणार आहे.

XPoSat वर Polarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray Spectroscopy and Timing (XSPECT) अशी दोन वैज्ञानिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे–X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर–black hole तसंच न्यूट्रॉन तारे (neutron star) यांचा सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा  –  राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर, मागण्या काय? 

२०२५ मध्ये इस्रो भारतीय अंतराळवीर गगनयान (Gaganyaan) मोहिमेद्वारे अवकाशात पाठवणार आहे, या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या गगनयान एक आणि दोन असा मानवविरहित मोहिमा याचवर्षी होणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी यावेळी दिली. तसंच विविध उपग्रहांचे, वैज्ञानिक उपकरणांचे प्रक्षेपणही यावर्षी केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button