मंत्रिमंडळातून ‘या’ ११ दिग्गजांचा पत्ता कट; कोणाकोणाला वगळलं?
![These 11 veterans have been removed from the cabinet.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Maharashtra-Cabinet-Expansion-780x470.jpg)
Maharashtra Cabinet Expansion | राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार स्थापन झालं आहे. अशातच काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्यात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र यावेळी अनेक मंत्र्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.
‘या’ नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट :
- छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस )
2. सुधीर मुनगंटीवार (भाजप)
3. दीपक केसरकर (शिवसेना)
4. दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
हेही वाचा – ‘काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा’; ओमर अब्दुल्ला यांचा सल्ला
5. अब्दुल सत्तार (शिवसेना)
6. विजयकुमार गावित (भाजप)
7. तानाजी सावंत (शिवसेना)
8. रवींद्र चव्हाण (भाजप)
9. सुरेश खाडे (भाजप)
10. अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
11. संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दरम्यान, महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.