शिवसेना आणि भाजपाचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला! बावनकुळें म्हणाले,.
भाजपा २४० जागा लढवण्याच्या तयारीत
![The seat sharing formula of Shiv Sena and BJP was decided](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/chandrashekhar-bawankule-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. यासंबंधी भाजुपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांमध्ये निवडणूक लढवली जाते. अशातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असं बावनकुळे म्हणाले.