TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

पिंपळे सौदागर परिसरातील कोकणे चौकातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार!

ठोस उपाययोजनांसाठी नाना काटे व शत्रुघ्न काटे यांचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा व बैठक

पिंपरी:

दोन दिवसांपुर्वी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील कोकणे चौकात अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यानुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी नाना काटे व शत्रुघ्न काटे आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यामध्ये अपघात व वाहतूक कोंडी कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

कोकणे चौकात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच याचा फटका वाहनचालकांसह व्यापारी व शेजारील सोसायटी धारकांना बसत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे या चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगवी वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद गोकुळे, पोलिस कर्मचारी व महापालिकेचे अधिकारी यांच्यासमवेत अपघात ठिकाणी जाऊन सविस्तर पाहणी केली. तसेच परिसरातील विविध सोसयाटीमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला व त्याच्या सुचना व तक्रारी समजून घेतल्या.

यामध्ये कोकणे चौक ते स्वामी समर्थ मठापर्यंत तसेच एसएनबीपी शाळा ते कोकणे चौक एकेरी वाहतूक करावी. एसएनबीपी शाळेच्या वाहतुकीबाबत शाळेचे संस्थापक भोसले सर व शाळेच्या मुख्याध्यापिका व्यकंटरमण मॅडम यांच्याशी भेटुन शाळा पातळीवर योग्य उपाययोजना कराव्यात अशा सुचना करण्यात आल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शाळेच्या वतीने वाहतुक वार्डन नियुक्त केले जातील असे आश्वासन देण्यात आले. कोकणे चौक येथील बंद सिग्नल चालु करावेत. कोकणे चौक येथे वाहतुकीसाठी पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. चौकात चारही बाजूने गतिरोधक उभारावेत. चौकापासून ठराविक अंतरावर नोपार्किंग करणे. बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे. तसेच कोकणे चौक येथील वाहतुकी बाबत योग्य उपाययोजना करण्याच्या सुचना देखील वाहतुक विभागाला करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button