breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट : मावळ लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार तारणहार की अडचण?

खासदार श्रीरंग बारणे उमेदवारीवर ठाम; मावळ लोकसभा मतदार संघात गुंता वाढणार?

पिंपरी : विशेष प्रतिनिधी

विद्यमान विद्यमान खासदार असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मीच महायुतीचा उमेदवार असणार, असा ठाम विश्‍वास मावळ विधानसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्‍त केला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील भाजपा-शिवसेना युतीमध्ये नव्याने साथीदार झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवेळच्या निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार प्रयत्न करणार की महायुतीचा धर्म निभावून खासदार बारणे यांच्यासाठीच तारणहार बनणार? या बाबत कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

मावळ लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खा. बारणे हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत. दरम्यानच्या काळात शिवसेना दोन गटात विभागली आहे. त्यामुळे मावळ मधील जनता आगामी काळात नेमक्‍या कोणत्या गटासोबत राहिल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गटही सामील झाला आहे. गतवेळी मावळमध्ये खा. बारणे विरूद्ध पार्थ पवार संघर्ष सर्वांनी पाहिला. यामध्ये पार्थ पवारांना खा. बारणे यांच्या विरोधात पराभव पहायला मिळाला. सध्या झालेल्या नव्या युतीमुळे उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी या मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार हक्‍क सांगणार का हे पहावे लागणार आहे. तर ही राजकीय चर्चा होऊ नये म्हणून खा. श्रीरंग बारणे यांनी मीच उमेदवार असल्याचे स्वघोषित केले आहे. महायुती टिकलीच तर उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून शहरातील पाणी कपात रद्द होणार

पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा काढणार ?

गत निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खा. श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात ते उतरले तर युतीचा धर्म उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कार्यकर्ते पाळतील, या बाबत शंका उपस्थित होत आहे. येणाऱ्या निवडणूक निकालानंतर ते अधिक स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीची ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका…

शिरुर लोकसभा लढवण्याची तयारी भाजपाने केली आहे. याउलट, मावळची जागा शिंदे गटाला देण्याबाबत जवळपास निश्चित झाले होते. मात्र, आता राज्यातील समीकरणे बदलल्यामुळे मावळातील शिंदे गटाच्या जागा कुणाच्या पारड्यात पडणार, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदार असल्यामुळे या जागेवर शिंदे गट दावा करणार असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ‘वेट ॲन्ड वॉच’ ची भूमिका ठेवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button