ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागास ‘एनओसी’ तून मिळाले २४५ कोटींचे उत्पन्न

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेस अग्निशामक विभागाच्या ना हरकत दाखला (एनओसी फायर ऑडिट) शुल्कातून वर्षभरात २४५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ३९ कोटीने अधिक आहे. बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना संबंधित गृहप्रकल्पासाठी अग्निशामक विभागाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क अग्निशामक विभागाकडे जमा करावे लागते.

त्या शुल्कापोटी १ मार्च २०२२ ते ३१ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात अग्निशामक विभागास एकूण २४५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली. गेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात हे उत्पन्न २०६ कोटी इतके होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button